pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

100-घनसावंगी विधानसभा मतदार संघातून उढाण हिकमत बळीराम विजयी  

0 3 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.23

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 100-घनसावंगी मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार उढाण हिकमत बळीराम यांना 98,496 मते मिळाली. तसेच नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेशभैय्या टोपे यांना 96,187 इतकी मते मिळाली. यात शिवसेना पक्षाचे उमेदवार उढाण हिकमत बळीराम हे 2,309 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांनी उढाण हिकमत बळीराम यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निरिक्षक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगिता खटावकर यांची उपस्थिती होती.

100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून एकुण 23 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र. उमेदवारांचे नांव पक्ष मिळालेली मते
1 उढाण हिकमत बळीराम शिवसेना 98,496
2 जायभाये दिनकर बाबुराव बहुजन समाज पार्टी 874
3 राजेशभैय्या टोपे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 96,187
4 कावेरी बळीराम खटके वंचित बहुजन आघाडी 20,731
5 बाबासाहेब संतुकराव शेळके समता पार्टी 4,830
6 रमेश मारोतराव वाघ राष्ट्रीय समाज पक्ष 217
7 विलास महादेव वाघमारे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक 109
8 शाम कचरु साळवे बहुजन भारत पार्टी 554
9 आप्पा आन्ना झाकणे अपक्ष 183
10 उगले गजानन रामनाथ अपक्ष 142
11 उढाण सतिश गणपतराव अपक्ष 288
12 घाटगे सतिश जगन्नाथराव अपक्ष 23,696
13 चोथे शिवाजी कुंडलीकराव अपक्ष 2,324
14 दिनकर उघडे अपक्ष 1,785
15 निसार पटेल अपक्ष 654
16 पवार ज्ञानेश्वर प्रतापराव अपक्ष 828
17 बाबासाहेब पाटील शिंदे अपक्ष 1,090
18 ॲड भास्कर बन्सी मगरे अपक्ष 259
19 राजेंद्र बबनराव कुरणकर अपक्ष 1,088
20 रामदास आश्रुबा तौर अपक्ष 1,042
21 विलास आसाराम कोल्हे अपक्ष 144
22 श्रीहरी यादवराव जगताप अपक्ष 151
23 सतिश मधूकर घाडगे अपक्ष 131
24 नोटा 486

 

****

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे