शेकापमध्ये पक्षप्रवेशाचा ओघ कायम

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापमध्ये पक्षप्रवेशाचा ओघ गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे.
सावरखार- उरणचे युवा तरुण पिढी मयूर घरत (सामाजिक कार्यकर्ता), शुभम घरत, नितीन पाटील, विकी घरत, ऋषिकेश घरत, निलेश घरत, राज ठाकूर, रोहित आहिरवाड, सुमित ठाकूर यांनी प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.पाणजे बोकडविरा गावातून प्रितम म्हाञे याना उदंड प्रतिसाद मिळाला आहे. उरण विधानसभा मतदार संघातील शेकाप उमेदवार प्रितम जे एम म्हाञे यांचे पाणजे -बोकडविरा गावात फटाक्याच्या आतषबाजीत उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
बोकडविरा येथे प्रितम जे एम म्हाञे यांना प्रचारा दरम्यान मोठा प्रतिसाद मिळत असून बोकडविरा गावात प्रितम म्हाञे यांनी गाव भेट दौरा केला. यावेळी घराघरातून प्रितम जे एम म्हाञे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचार फेरीला आणि गाव भेट दौऱ्याला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. अनेक महिला, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग प्रीतम म्हात्रे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत. फुंडे सरपंच बिलालाशेठ याच्या नेतृत्वाखाली गावातून कार्यकर्त्यानी फेरी काढली. अबकी बार, प्रीतम म्हात्रे आमदार या घोषणा उरणमध्ये दिल्या जात आहेत. यावेळी महादेव, बंडाशेठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.