गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेचा ३६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या व गोर गरिबांना नेहमी मदतीचा हात देणाऱ्या गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडे या सामाजिक संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन राधाकृष्ण मंदिर, सारडे, उरण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत व विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात संपन्न झाला.दुपारी २ ते ४ श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ५ ते रात्री १० महाप्रसाद, पाहुण्यांचे स्वागत व सत्कार, आदी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, श्री साई देवस्थान साई मंदिर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्विचे संस्थापक राजू मुंबईकर, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भारत भोपी, सारडे ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील, उपसरपंच जीवन पाटील, गोवठने विकास मंचचे अध्यक्ष सुनिल वर्तक, माजी सरपंच नरेंद्रशेठ मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, पोलीस पाटील घनश्याम पाटील, ग्रामपंचायत सारडेचे सर्व सदस्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,उपाध्यक्ष विठ्ठल ममताबादे, आदी मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेच्या विविध सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडे तसेच सारडे ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.