बायपास मुळे बरडशेवाळा गावातील रस्त्यावर जिवघेण्या खड्डे वाहनधारकासह ग्रामस्थासाठी ठरत आहेत डोकेदुखी
संबंधित विभागाचे दुर्लक्ष ग्रामस्थांमध्ये नाराजी
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.17
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर हदगांव वांरगा रोडवर बरडशेवाळा येथे विविध कार्यालयासह मोठ्या संख्येचे गाव असल्याने बायपास करण्यात आला आहे. बायपास वरुन बरडशेवाळा गावात ये जा करण्यासाठी रस्त्याचे काम सदरील कंपनीकडुन होणार आहे.पण कंपनीवर काम करत असलेल्या अधिकारी कर्मचारी कामगारांनी कंपनीला बनेल त्यांनी कंगाल केले असल्याने गेल्या दोन वर्षांपासून कंपनी शेवटची घटका मोजत आहे.बिघडलेल्या नियोजनाने जागोजागी अर्धवट अवस्थेत काम असुन यामुळे बरडशेवाळा गावातील रस्त्यावर पडलेले खड्डे वाहनधारकासह बरडशेवाळा ग्रामस्थासाठी डोकेदुखी ठरत आहेत.गावातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तुरळक वाहने वगळता अनेक वाहनधारक बरडशेवाळा येथील प्रवास्यांना शालेय विद्यार्थ्यांना बायपास वरच उतरवित असल्याने तेथुन गावात येताना जाताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. थांबा असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस सह खाजगी वाहन खड्याला वैतागून बायपास रस्त्यानेच जात असल्याने अनेक अडचणी येत असल्याने एखादी अप्रीय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गावातील एका कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे गावकऱ्यांनी आपली कैफियत मांडुन संबंधित विभागाला आमच्या भावना लक्षात आणून देण्याची मागणी केली असता आमदार जवळगावकर यांनी काम लवकरच सुरू होणार असल्याने पडलेले खड्डे बुजविण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले .काम कधी सुरू होईल आणि कधी खड्डे बुजविण्याचे काम सुरू होईल याची गावकऱ्यांनी काळजी लागली आहे.