पण माणुसपणा तेवढा जपुयात- हभप सचिन महाराज लंबे

जिंतूर/ प्रतिनीधी,दि.8
माणसाची गेलेली श्रीमंती ऐश्वर्य, धन,द्रव्य, नौकरी,पैसा सर्व काही पुन्हा प्राप्त करता येते,माञ एकदा गमाविलेला माणुसपणा,दुखविले मन हे पुन्हा प्राप्त करता येत नाही,पुन्हा माणुस पणा जपुया यात असे विचार युवा कीर्तनकार ह.भ.प सचिन महाराज लंबे यानी येथील संतसेवक, पंचायत समिती, सा.पा.पुरवठा विभाग जिंतूर कनिष्ठ लिपिक ओमप्रकाश लोखंडे याच्या निवासस्थानी माता अन्नपुर्णा व्रताची व सुवासिनी पुजन या कार्यक्रमाची सांगता च्या कार्यक्रमप्रसंगी आपल्या किर्तनातुन मार्गदर्शन केले आहे.
यावेळी ओमप्रकाश लोखंडे,रमा ओमप्रकाश लोखंडे या दांपत्याने माता अन्नपुर्णा देवीचे पुजा, महाआरती केली व आलेल्या सर्व महीलाची पुजा करुन ओटी भरली आहेत.
यावेळी येथील संतोष काळे,दिनकरराव देशपांडे, विठ्ठल चव्हाण, बापुराव महाराज जाधव, पंजाबराव महाराज काळे,रुस्तुम म. ताठे,विश्वनाथ काळे,सदाशिव देशमुख, शिवाजी देशमुख, विठ्ठल घाटुळ,मृदुंगाचार्य दत्ता ऊगले,अजय गाडेकर, बोकनकर, पोलीस हक्क संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य प्रमुख धोंडीराम सातवणे,गुणाजी खैरमोडे,माऊली हारकळ,बापुराव ढवळे,तुळशीदास म.जाधव वसमत,तुकाराम वाघमारे,सुनील गांजरे,आसाराम गोरे,संतोष काळे,पांडुरंग डुब्बे,एकनाथ आवचार, ज्ञानेश्वर कटारे, जगदीश देशमुख साहील लोखंडे यांच्यासह सर्व लोखंडे परिवार येथील सर्व भजनी मंडळीसह आदीची उपस्थित होते.