जयंत बाळकृष्ण गांगण याचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा.
आमदार महेश बालदी यांनी प्रत्यक्ष भेट घेउन दिल्या शुभेच्छा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
उरणमधील सामाजिक कार्यकर्ते जयंत बाळकृष्ण गांगण यांचा ७५ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयंत गांगण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण चारफाटा येथे झोपडपट्टीतील गोरगरिब मुलांना मोफत अन्नदान करण्यात आले. त्यानंतर आनंदी हॉटेल,भोईर गार्डन,कोटनाका उरण येथे वाढ दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी जयंत गांगण यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी जयंत गांगण यांची प्रत्यक्ष भेट घेउन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध प्रतिष्ठित मान्यवर, गांगण कुटुंब परिवार, मित्र परिवार, बँकिंग क्षेत्र व न्याय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.अशा प्रकारे उरणमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत गांगण यांचा ७५ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.