म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या नेत्यांचा व कर्तव्यदक्ष पत्रकारांचा यूनियन च्या वतीने सत्कार

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या नेत्यांचा आणि सातत्याने विविध लढ्याला प्रसिद्धी देणाऱ्या कर्तव्यदक्ष पत्रकारांचा उरण नगरपरिषद युनिटच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी तसेच न्यायालयात प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून घेतल्या त्या पैकी एक विशेष मागणी म्हणजे औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित याचिकेचा शासनातर्फे नियुक्त केलेले सिनियर कौन्सिल ॲड विजयकुमार सक्पाळ , सरकारी वकील श्री गिरासे, वकील हरीश बाली, वकील शिंदे, वकील शेळके यांच्या समवेत सततचा पाठपुरावा तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले सुस्पष्ट शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतरही राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील मुख्याधिकारी तसेच आस्थापना विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी या बाबत संभ्रम दूर करण्यासाठी मा. आयुक्त तथा संचालक मनोज रानडे साहेब यांच्या समवेत सातत्यपूर्ण चर्चा सततचा पाठपुरावा करून हे संभ्रम दूर करण्यासाठी आणखी एक सुस्पष्ट परिपत्रक काढण्यात आले. त्यामुळे राज्यातील सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशस्वी संघर्षा मध्ये पत्रकारांची भूमिका फार महत्त्वाची असल्यामुळे उरण मधील विविध पद्धतीने सहकार्य करणाऱ्या “कर्तव्य दक्ष पत्रकार” म्हणून “जाहीर सत्कार” उरण नगरपरिषद कार्यालय पटांगणात करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जिवन केणी, पत्रकार प्रविण पुरो,पत्रकार मिलिंद खारपाटील, पत्रकार , महेश भोईर, ॲड. योगिता म्हात्रे, पत्रकार दिनेश पवार, पत्रकार संजय गायकवाड,पत्रकार रमेश थळी,पत्रकार विठ्ठल ममताबादे, पत्रकार सुभाष कडू, पत्रकार अनंत नारंगीकर, पत्रकार पंकज ठाकूर, पत्रकार शेखर पाटील, हेमंत देशमुख, पत्रकार प्रवीण पाटील, पत्रकार सुयोग गायकवाड आणि या पत्रकाररांबरोबर जे नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे उरण पत्रकार संघाचे अध्यक्ष घनःश्याम कडू, पत्रकार जगदीश तांडेल, पत्रकार विरेश मोडखरकर , पत्रकार मधूकर ठाकूर, पत्रकार अजित पाटील ह्यांनी पुर्व नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही तसेच उरण व्यतिरिक्त राज्यातील विविध विभागांतील पत्रकारांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच राज्यातील कामगार कर्मचार्यांना न्याय मिळत असतो हे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी नम्र पणे नमूद केले. कामगार नेते अनिल जाधव यांनी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील कंत्राटी कामगारांना वेठबिगारी पद्धतीने राबवले जात आहे १९४८ च्या किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन दिले जात नाही त्याकरिता ५ दिवस उपोषण केले मा. आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी याही विषयामध्ये कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी अतिशय सकारात्मक तीन एकामागून एक परिपत्रके प्रसिद्ध केली तरीही राज्यात कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अडचणी येतच आहेत यावर राज्यव्यापी आंदोलन अंतीम निर्णय मिळेपर्यंत केले जाणार असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार प्रदिप पाटील , दिनेश पवार यांनी समाजाला उत्तम आरोग्य देणाऱ्या सफाई कामगारांचे कौतूक केले. पत्रकार प्रविण पुरो यांनी कामगार चळवळी समोर आलेली आव्हानांवर एकजूटीने मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ कामगार नेते ॲड सुरेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांचे योगदान सर्वार्थाने मोठे आहे सर्वांना न्याय देणार्या वेळ प्रसंगी जोखीम उचलणार्या पत्रकारांना शासनाकडून योग्य असे मानधन सुरु होणे आवश्यक आहे असे मत मांडले तसेच कामगार चळवळीत काम करताना कष्टकरी वर्गासाठी या देशाचे माजी संरक्षणमंत्री ज्येष्ठ कामगार नेते जाॅर्ज फर्नांडिस यांनी आम्हाला दिलेली शिकवण पुढील कार्यकर्त्यांना देणे हेच काम अधिक मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाचे कामगार चळवळी संदर्भात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तर आणि तरच कामगार वर्गाचे अस्तित्व टिकणार आपण सर्व मिळून खाजगीकरण , जागतिकीकरण, उदारीकरण याचा अभ्यास करण्याची , यांच्या दुष्परिणामांचा पुन्हा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असे सांगतात आम्ही सर्व मिळून प्रयत्न करुया असे सांगून आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार नेते मधुकर भोईर, हरेश जाधव,रमेश कांबळे , नरेंद्र उभारे , धनेश कासारे, महेंद्र साळवी, माधव सिद्धेश्वरे आणि सर्व उरण नगरपरिषदेमधील सफाई कर्मचारी आणि त्यांचे वारस यांनी प्रचंड मेहनत घेतली.