गेवराई येथे कुंडलिनी शक्तिची जागृती कार्यक्रमाचे आयोजन
जागृती कार्यक्रमाचे आयोजन सहजयोगी ताई-दादांनी परमचैतन्याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमात सहभागी व्हावे

जालना/प्रतिनिधी,दि.8
परमपूज्य श्री माताजी जन्म शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यातील गेवराई येथे रविवार दि.६ डिसेंबर रोजी सायं. ६.३० वाजता कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रमाचे जिल्हा परिषद कन्या शाळा मेन रोड, गेवराई येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त सहजयोगी ताई-दादांनी परमचैतन्याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दि ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा, गेवराई येथे मोठा कार्यक्रम होणार आहे. परमपूज्य श्री माताजी जन्म शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांच्या आशीर्वादाने हे कार्य घडत असून दि.६ डिसेंबर रोजी प्रचार, प्रसार, करणे, त्याचबरोबर ८ डिसेंबर रोजी मेगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या ताई दादांसाठी साई सिद्धी हॉल, कोल्हेर रोड, बेद्रे लॉन्सजवळ राहण्याची सोय करण्यात आलेली