चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.03
महिला व बाल विकास विभागामार्फत बालगृहातील बालकांसाठी दरवर्षी तीन दिवसीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत दि.6 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत चाचा नेहरु बाल महोत्सवाचे जालना येथील जिल्हा पोलीस मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या बाल महोत्सवाचे उद्घाटन दि.6 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते होणार आहे. या बाल महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.