मोरया साई गोविंदा पथक कुंडेगाव कोळीवाडा तर्फे दहीहंडीची जोरदार तयारी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
गोपाळकाला सण जवळ आला असून सोमवार दिनांक २६/८/२०२४ रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवार दिनांक २७/८/२०२४ रोजी गोपाळकाला सण आहे.या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून विविध गोविंदा पथकाची सुद्धा रात्रंदिवस तयारी सुरू आहे विशेषतः संध्याकाळी तसेच रात्री कामावरून तरुण वर्ग घरी आले की गोपाळकालाची तयारी अर्थातच दहीहंडी फोडण्याची प्रॅक्टिस करतात. एकमेकावर थर रचून मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा दररोज सराव केला जातो. उरण तालुक्यातील नवघर कुंडेगाव कोळीवाडा येथे मोरया साई गोविंदा पथक तर्फे जोरदार तयारी सुरू आहे.सण २०१५ साली मोरया साई गोविंदा पथकाची स्थापना झाली असून या पथकाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. कुंडेगाव कोळीवाडा गावातील बालगोपाळ व तरुणांचा या पथकात समावेश आहे. जास्तीत जास्त बक्षीसे मिळविण्यासाठी व आपल्या पथकाचे नाव अग्रेसर राहावे यासाठी मोरया साई गोविंदा पथक कार्यरत आहे. या पथकाचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष राकेश चोगले, खजिनदार धर्मेंद्र चोगले आहेत. तर प्रशिक्षक प्रशांत बाळकृष्ण कोळी(हनुमान कोळीवाडा )हे या पथकाला उत्तम असे मार्गदर्शन करत आहेत.शिवसाई राम २८२८, फोस्टर ग्रुप, श्री साई गणेश पदयात्री, ब्रह्मा बॉईज, बाप्पा मोरया ग्रुप, मोरया साई ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कुंडेगाव कोळीवाडा आदींचे सहकार्य मोरया साई गोविंदा पथकाला लाभत आहे.