नरसी येथील ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यासाठी हदगाव तालुक्यातील ओबीसी समाज सरसावला

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.3
बामणी फाटा येथे बैठक
ओबीसी आरक्षण बचाव व जात निहाय जनगणना त्वरित करा या प्रमुख मागणीसाठी रविवार सात जानेवारी रोजी नरसी येथे महाराष्ट्रातील ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ बालासाहेब आंबेडकर प्रकाश अण्णा शेंडगे आमदार विनय कोरे आमदार विजय वडेट्टीवार आमदार महादेव जानकर आमदार गोपीचंद पडवळकर आमदार तुषार राठोड शब्बीर अन्सारी बबनराव तायवाडे चंद्रकांत बावकर राजाराम पाटील लक्ष्मणराव गायकवाड, शाहीर सचिन माळी आणि शितल साठे हे शाहीरी जलसा होणार, यासह ओबीसी समाजातील नेते मंडळीसह समाज बांधव उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्यात पुर्व तयारी साठी प्रत्येक तालुक्यातील गाव पातळीवर बैठका होत आहेत. बुधवार तिन जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नरसी ओबीसी समाज मेळाव्याचे निमंत्रण महेंद्र देमगुंडे यांच्या उपस्थितीत हदगांव तालुक्यातील सर्व पक्षीय विविध क्षेत्रातील ओबीसी समाज बांधवाची बामणी फाटा येथील बरडशेवाळा रोडवर दत्तराव नाईक यांच्या शेतात व्हिजन इग्लीश स्कुल परीसरात बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित समाज बांधवाना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीतुन एकच पर्व ओबीसी सर्व असा सुर बघायला मिळला.यावेळी हदगाव तालुक्यातील येथील ओबीसी समाज बांधवानी नरसी येथील मेळाव्याला हदगांव तालुक्यातुन दहा हजार ओबीसी बांधवानी जाण्याचा निर्धार व्यक्त केला.