अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जालना जिल्हा दौऱ्यावर

जालना/प्रतिनिधी,दि.5
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. सोमवार दि.8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जा लनाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाच्या योजनांची आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3 वाजता भाजपा कार्यालय, जालना येथे भेट देतील. आणि दुपारी 4.30 वाजता परभणीकडे प्रयाण करतील