केंद्रीय गृहमंत्री यांचा जालना जिल्हा दौरा; आकाशात उडणारी उपकरणे (ड्रोनसह) उडविण्यावर निर्बंध

जालना/प्रतिनिधी,दि.7
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दि. 8 मे 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच मा. मंत्री महोदयांच्या सुरक्षा व्यवस्थेचे अनुषंगाने संपूर्ण जालना जिल्हयाच्या हद्दीत पॅराग्लायडर्स, पॅरा-मोटर्स, हॅंग ग्लायडर्स, मायक्रोलाईट एरोप्लेन्स, हॉट एअर बलुन्स, ड्रोन आणि खाजगी हेलिकॉप्टर उडविण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश जारी केले आहेत. या निर्बंधामधून पोलीस अधिक्षक, जालना यांचे कार्यालयाकडून बंदोबस्त कामी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनला सूट देण्यात आली आहे. हा आदेश दि. 8 मे रोजीचे रात्रीचे 12:01 वाजेपासुन ते दिनांक दि. 9 मे रोजीचे सकाळी 6:00 वाजेपावेतो अंमलात राहील, असे आदेशात नमूद केले आहे.