दिव्यांग बांधवांना न्याय हक्क द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठींबा

नांदेड/ प्रतिनिधी,दि.6
दिव्यांग,वृध्द निराधार बांधवांना शासनाने अनेक योजना जाहिर करुन ते फक्त कागदावरच राहतात असतात.दिव्यांगाना हक्क मिळावा म्हणून शासनाने दिव्यांग कायदा २०१६ चार कायदा करून त्यांचि अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अनेक प्रश्नांसाठी अनेक आंदोलने करुन कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे होत नसल्यामुळे दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांचा, वृध्द, निराधार बांधवांना हक्क द्या देता येत नसेल तर आमची अवहेलना होऊ नये जंगली जनावराप्रमाणे जगने अशक्य असल्यामुळे या द्रारिद्र जीवनातुन मुक्तता करण्यात यावि म्हणून दि.१० सप्टेंबर २०२४ पासुन ऑफिस वेळेत दररोज अनेक प्रकारचे बेमुदत धरने आंदोलन आयोजित केले त्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड दिव्यांग, जिल्हा अध्यक्ष प्रदिप पाटिल यांनी जाहीर पाठिंबा व आंदोलनात सहभागी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांचा नी, पदाधिकारी उपस्थित राहुन आपल्या हक्कासाठी सहभागी होत असल्याचे जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले.
निवेदन देताना संभाजी ब्रिगेड चे दिव्यांग आघाडी चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पाटील गुबरे सुगावकर, सं.बि.जिल्हाअध्यक्ष संभाजी पाटील आलेगावकर, संभाजी बि.सुभाष पाटील,उप अध्यक्ष हांगरगेकर सर,शहर अध्यक्ष मारोतराव मेढेवाड, खिलारे,ई पदाधिकारी उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रक संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेडच्या वतीने दिले.