धनगर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील : गजानन पाटील वाळके, प्रदेशाध्यक्ष, मेस्को

जालना / प्रतिनिधी,दि.3
रेवगाव : येथील किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धनगर समाज योजने अंतर्गत मान्यवरांचे हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
आदिवासी समाजाप्रमाणे धनगर समाजाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांना सवलती देणे हि शासनाची भुमिका आहे, असे प्रतिपादन मेस्को इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके यांनी रेवगाव येथे व्यक्त केले. रेवगाव येथील किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धनगर समाज योजने अंतर्गत मान्यवरांचे हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेस्को इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके तर प्रमुख पाहुणे म्हणून रेवगावचे सरपंच रामेश्वर चव्हाण, माजी सरपंच बाबुराव गोल्डे, ग्राम पंचायत सदस्य सचिन गोल्डे, पोकळवडगावचे सरपंच सातपुते, सदस्य उजेड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेस्कोचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके म्हणाले की, विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे देण्याचे व जीवनाला आकार देण्याचे, विद्यार्थी सक्षमपणे घडवण्याचे काम रेवगाव येथील किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल ही शाळा सदैव करीत असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था प्रतिनिधी नारायण गोल्डे, प्राचार्य व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.