18 – जालना लोकसभा मतदारसंघ मुद्रीत माध्यमाद्वारे (वृत्तपत्र) मतदानाचा दिवस आणि मतदान पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक
जालना/प्रतिनिधी,दि.10
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. 18 – जालना लोकसभा मतदारसंघासाठी माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे आहेत. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे तसेच मुद्रीत माध्यमाव्दारे (वृत्तपत्र) मतदान आणि मतदाना पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात सोमवार, दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने दि. 12 मे आणि 13 मे 2024 रोजी उमेदवारांना वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व प्रमाणिकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी आपले अर्ज माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.