बरडशेवाळा आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारीवर्गाचे काम कौतुकास्पद
आमदार जवळगावकर यांनी केंद्रातील सुरु असलेल्या विविध विकास कामास भेट देऊन केल्या आवश्यक सुचना

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.19
राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत अतिसंवेदनशील असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार जवळगावकर यांनी आपल्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष असताना स्थानिक जील्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर व गंगासागर यांच्या माध्यमातून विविध योजनेतील निधीतुन विकास कामास प्राधान्य देऊन आरोग्य केंद्र आकर्षण केले. तर शासन दरबारी पाठपुरावा करीत गरजेनुसार या ठिकाणी दोन अनुभवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. भिसे व डाॅ.के.सी.बरगे उपलब्ध केले. अनुभवातून अधिकारी कर्मचारी वर्गाने कमी कर्मचा-यावर कुटुंब शस्त्रक्रियेसह विविध सेवेत कौतुकास्पद कामाने आरोग्य केंद्र सन्मानित झाले.
मंगळवार अठरा जुन रोजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी प्रा. आरोग्य केंद्रातील भेटीत पाठपुराव्यातुन सुरु असलेल्या विकास कामातील सोलार पॅनल सिस्टीम सुरु करण्यासाठी कार्यकारी अभियंत्याला भोकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व आवश्यक असलेली डीपी ताबडतोब बसविण्याबाबत सूचना केली. तर परीसरातील गार्डनसह विविध विकास कामाची पाहणी केली. केंद्रातील अर्धवट अवस्थेतील असलेले कामे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारासह संबंधित विभागाला आवश्यक सुचना केल्या. अधिकारी कर्मचारीवर्गाच्या कामाचे कौतुक करत आरोग्य केंद्रातील रिक्त पदासह तात्काळ आवश्यक परीचराचा प्रश्न निकाली लावण्याच्या सुचना केल्या.
यावेळी राजेश जैन सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर प्रभाकर दहिभाते , आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी, बि.डी. राठोड ,आरोग्य सहायिका एल. एम.वाघमारे, औषध निर्माण अधिकारी जी. यू. देशमुख व आरोग्य सेविका व्ही. के. काळसरे , एस. बी. टेकाळे, अधिपरिचारिका जे. के. पङघणे, कनिष्ठ सहाय्यक एस. एन. सूर्यवंशी, कार्यक्रम सहाय्यक एस. बी. पांढरे, आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्ग उपस्थित होते.