महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची थकीत कर्ज प्रकरणासाठी सवलत योजना
जालना/प्रतिनिधी,दि. 31
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा योजना दि.31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांचे जिल्हा कार्यालय, जालना यांच्या विविध कर्ज योजनेअंर्तगत जालना जिल्ह्यातील इतर मागास प्रर्वगातील लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्हा कार्यालयाकडून वाटप झालेल्या थकीत लाभार्थींनी महामंडळाकडून थकीत व्याज दरात 50 टक्के सवलत दि.31 मार्च 2025 पर्यंत देण्यात येणार आहे. या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेवुन सर्व संबधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करुन कर्ज खाते बंद करण्यासाठी जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे भेट द्यावी अथवा दुरध्वनी क्र. 02482-223420 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.