ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हदगांव तालुक्यातील सकल ओबीसी समाज एकवटला

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.21
गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी तुन आरक्षण मिळावे यासाठी काही समाज बांधवाकडुन प्रयत्न होत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी वडीगोद्री ता.अंबड जिल्हा जालना येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या आठवड्यापासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणासह महाराष्ट्रातील ओबीसी समाजाकडून ठिक ठिकाणी सुरु असलेले उपोषण आंदोलन निवेदनाला पाठींबा व मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाला विरोध न करता पाठींबा देत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हदगांव तालुक्यातील सकल ओबीसी समाजाने शुक्रवार एकेवीस रोजी हदगांव तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कांबळे यांना भेटून ओबीसी समाज बांधवाच्या भावना शासन दरबारी देण्यासाठी शेकडो समाज बांधवाच्या सह्या असलेले लेखी निवेदन दिले.यावेळी ओबीसी आरक्षणात घुसखोरी झाल्यास समाज बांधव रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले. यावेळी हदगांव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील ओबीसी समाजाचे सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सकल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.