जिल्हा परिषद शाळेला सरपंच श्रीमती संगीता जाधव यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य भेट

प्रतिनिधी/अंबड,दि.19
झिरपीतांडा (वसंतनगर ) ता अंबड येथील जि.प.प्राथमिक शाळा झिरपी तांडा वसंत नगर शाळेला सरपंच श्रीमती.संगीता अशोक जाधव यांच्या हस्ते projector मुख्याध्यापक कल्याण पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. तसेच e -learning रूम चे उद्घाटन करण्यात आले. या मुळे विद्यार्थांना अध्यानपन मनोरंजक व आनंददायी होणार आहे.तसेच जि प प्रा शा कैलासनगर शाळेला देखील सरपंच श्रीमती.संगीता अशोक जाधव यांनी ट्राली बुलूटूथ १८ इंची स्पीकर, दोन माईक सहीत दिले आहेत.यांचा उपयोग दैनंदिन परिपाठ ,बडबड गिते , बाराखाडी , कविता, सांस्कृतिक कार्यक्रम अध्ययन अध्यापणासाठी करता येईल यावेळी शिक्षक,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोफ जाधव,रमेश जाधव , अमोल जाधव,माजी सरपंच प्रेमसिग राठोड ग्रामसेवक, राठोड जे आर, तंटामुकी अध्यक्ष बाबूराव जाधव,राहुल जाधव , अमोल राठोड ग्रामस्थ व तरुण मंडळी. उपाथित होते.