मोर्शीत सर्वात गाजलेल्या त्या मतदारसंघात आमदार कोण होणार या कडे सर्वांचं लक्ष वेधले आहे,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.22
मोर्शी : विदर्भातील अमरावतीमध्ये 8 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त गाजलेला मतदार संघ म्हणून मोर्शी विधानसभा मतदार संघाची ओळख आहे.
मोर्शी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 23 नोव्हेंबरला कुणाचं सरकार येणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सर्वाधिक जागा आहे. त्यामुळे विदर्भात जो बाजी मारले त्याचा सत्तेचा मार्ग सोप्पा होणार आहे. विदर्भातील अमरावतीमध्ये 8 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त गाजलेला मतदार संघ म्हणून मोर्शी विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. या निवडणुकीत देखील मोर्शी मतदार संघात चौरंगी लढत आहे. मोर्शी मतदार संघात 19 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवार यांच्यात मुख्य लढत आहे.
मतगदा विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुती सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी सरकार येईल असं भाकित वर्तवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणाचं सरकार येईल याची उत्सुकता शिगेला लागली आहे. अमरावतीतील मोर्शी मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार गट पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गिरीश कराळे, महायुतीतील भाजप पक्षाचे उमेदवार चंदू उर्फ उमेश यावलकर, अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे हे मुख्य लढती आहेत.
मोर्शी मतदार संघातील राजुरा बाजार या गावातील नागरिकांशी तुमच्या मनातील चर्चा केली. तेव्हा तेथील नागरिकांनी आमदार हे भाजपचे उमेश उर्फ चंदू यावलकर झाले पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. त्यानंतर दुसरी पसंती ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट गिरीश कराळे यांना मिळाली आहे. तर विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना सुद्धा नागरिकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरला ईव्हीएम मशीनमधून मोर्शीकर कुणाला संधी देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.