सप्त खंजिरी वादक गोविंद पाल इंगळे यांचे जिल्हा सचिव पदी निवड

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.19
सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजरी वादक गोविंद पाल महाराज इंगळे यांची युवा प्रबोधन कला मंच मुंबई जालना जिल्हा कार्यकारणी मध्ये जिल्हा सचिव पदी निवड झाली असून युवा प्रबोधन कला मंच मुंबईचे महासचिव शाहीर भदर्गे यांच्या हस्ते एका छोट्या खाणी कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष साळवे साहेब खरात साहेब राऊत सर तथा राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते युवा प्रबोधन कला मंच हा कलाकारांच्या न्यायासाठी काम करणारे खंबीर नेतृत्व श्री साळवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काम करते त्यात नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे वयोवृद्ध कलाकारांचे मानधनाचा प्रश्न असो या अनेक कलाकारांच्या संबंधी प्रश्न असो युवा प्रबोधन कला मंच कलाकारांच्या पाठीशी सदैव उभे आहे व राहणार कलाकारचे दोन वर्षापासून प्रलंबित असलेले वयोवृद्ध कलाकारांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडू आहे त्यातच यावर्षीचे प्रस्ताव दाखल करण्याचे तारीख जवळ येत आहे हे प्रस्ताव प्रवलंबित का राहिली हे प्रस्ताव दरवर्षी निकाली काढल्यास दरवर्षी जिल्ह्यातील शंभर कलाकारांना वृध्दापकाळामध्ये आर्थिक मदत होऊ शकते परंतु गेल्या दोन वर्षाची प्रस्ताव अजूनही प्रशासनाकडे पडून आहे याची खंत जिल्हा सचिव सप्तखंजरी खंजिरी वादक गोविंद पाल महाराज इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केली प्रशासनाने कलाकारांचे दुःख समजून घेऊन कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे अशी विनंती इंगळे महाराजांनी केली गोविंद पाल महाराज यांची जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या श्री जगदंबा इंजिनिअरिंग वर्क्स टेंभुर्णी या वेल्डिंग दुकान वर येऊन अनेक मान्यवर तसेच कलाकारांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सर्वांचे आभार मानतो