जालना शहर महानगरपालिकेत १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी, दि.21
जालना शहर महानगरपालिका घोषित झाल्यानंतर प्रथमच पतंजली योगपीठ हरिद्वार संचलितपतंजली योग समिती जालना, जालना शहर महानगरपालिका, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून 2024 रोजी मातोश्री लॉन्स अंबड रोड येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. योगाचे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी राज्य मंत्री श्री अर्जुनभाऊ खोतकर, जालना महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे श्री सुनील बापू आर्दड, श्री नितीन तोतला ,संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम बागल , सौ पूजाताई आर्दड ,प्राचार्य श्री प्रसाद मदन, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक पतंजलि जालना चे मुख्य प्रल्हादजी हरबक यांनी केले,
योगाचे धडे आंतरराष्ट्रीय योग शिक्षक माऊली हरबक यांनी दिले ,त्यांनी सांगितले की, गेली ३ वर्षापासून मातोश्री लॉन्स येथे निःशुल्क स्वरुपात योग शिकवला जातो,रक्तदान शिबिर अनेक उपक्रम राबविले जातात सुनिल आर्दड यांनी कोणतेही शुल्क घेत नाही योगाचे महत्व पटून देत्तांनी श्रीमदभागवत ,भगवतगीता ,ज्ञानेश्वरी ,तुकाराममहाराज यांच्या गाथेतील उदाहरण पटून दिले,मानसिक चलबिचलतेमुळे ,अस्थिरता मुळे रोग निर्माण होतात योगामुळे सर्व स्थिरता येते व माणूस निरोगी रहातो त्या मुळे प्रत्येकाने दररोज १ तास तरी योग करावा.
महर्षी पतंजलि यांनी आपल्या सूत्रात सांगितले आहे, ‘योगश्चित वृत्ति निरोधः।
मग शांति पाठ होऊन समारोप करण्यात आला,
या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जालना शहर महानगरपालिका उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड , केशव कानपुडे, विजय फुलम्ब्रीकर, सचिन मेहरा,मुकुंद जहागीरदार , अशोक तारडे ,राहुल सरकटे,सुरेश बहुरे,दिगंबर कुलकर्णी,खाडे,मिसाळ,पोपालघट,विश्वम्बर शिंदे ,अरुण राखडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र न्यायाधीश यांनी केले तर आभार अशोक तारडे यांनी केले कार्यक्रमास योगसाधक उपस्थित होते.