राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथील विद्यार्थ्यांचे “तालुकास्तरीय बुद्धिबळ” स्पर्धेमध्ये घवघवीत यश !

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.25
आज दिनांक 25 ऑगस्ट 2023 जाफराबाद येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ विद्यालय टेंभुर्णी येथील दोन विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून अहिल्या दीपक बोर्हाडे वयोगट 14 वर्षे मुलींमधून प्रथम क्रमांक तर ओम कैलास कोरडे वयोगट सतरा वर्षे मुलांमधून द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये निवड झाली असुन त्यांच्या या यशाबद्दल जिजामाता महिला विकास व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व नगराध्यक्ष जाफ्राबाद माननीय डॉ.सौ.सुरेखाताई संजयजी लहाने व जिजाऊ ग्रामीण विकास व मित्र मंडळ जाफराबाद भोकरदन चे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री संजयजी लहाने सर यांनी सर्व विजेत्यांचे व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री यु.बी.वाघ सर व जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जीआर.वायाळ सर यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी क्रीडा विभाग प्रमुख श्री पी बी खेडेकर सर व क्रीडा शिक्षक श्री एन.एम.शेख सर यांनी परिश्रम घेतले.* *सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.*