pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भारतीय मजदूर संघाचे विविध न्याय मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्च रोजी निदर्शने.

भारतीय मजदूर संघाच्या पुण्यातील युवा कामगार संमेलनात विविध विषयावर चर्चा. बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय

0 3 1 4 7 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशाचे दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील ४५ वयाखालील युवा कामगारांचे संमेलन शिवशंकर सभागृह पुणे येथे संपन्न झाले.या संमेलनास महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातून व विविध उद्योगातून ९५८ पुरुष व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा, प्रदेशाचे अध्यक्ष अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, प्रदेशाचे संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेशजी , पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

उद्घाटन सत्रामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा यांनी भारतीय मजदूर संघाची रीती आणि नीती व त्यामध्ये तरुणांच्या सहभाग या विषयावर कामगारांना मार्गदर्शन केले तसेच किरण मिलगीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रमिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व सदर सत्राचे सूत्रसंचालन ऍड.विशाल मोहिते प्रदेश सचिव यांनी केले.

दुसऱ्या सत्रामध्ये २०४७ चा विकसित भारत व त्यामध्ये युवा कामगारांची भूमिका व योगदान, याविषयी मार्गदर्शन प्राध्यापक नारायण गुणे अर्थतज्ञ यांनी युवा कामगारांसमोर मांडले. २०४७ साली आजचे युवक हे खऱ्या अर्थाने या सगळ्या विकसित भारताचे शिल्पकार असणार आहेत. त्यामुळे याची जाणीव ठेवून युवा कामगारांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सत्राचे सूत्रसंचालन भारतीय मजदुर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी केले. सदर युवा संमेलनास पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतीय मजदूर संघ ही देश भक्त कामगारांची संघटना असून देशातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी असल्याने युवकांनी पेलावी व या कामात आपणास जोखून द्यावे. अशा प्रकारची अपेक्षा खा. मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
सदर सत्रामध्ये व्यासपीठावर अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या प्रदेश महामंत्री वनिता वाडकर व प्रतिरक्षा मजदूर महासंघाचे ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.

पुढील सत्रामध्ये शिरीष आपटे यांनी पंचपरिवर्तन या सत्रामध्ये कुटुंब प्रबोधन व नागरिक कर्तव्य या विषयाची माहिती युवा कार्यकर्त्यांना दिली.यामध्ये प्रामुख्याने भाषा, वेशभूषा , भवन तसेच वेगवेगळ्या संस्कारांमध्ये संगत संस्कार सहवास याविषयीची भूमिका मांडली असून आपलं घर हे एकात्म मानवतेचे प्रतीक असणारे घर असले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका या सत्रामध्ये मांडली. सदरच्या सत्राचे सूत्रसंचालन सागर पवार पुणे जिल्हा चिटणीस यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संतोष गदादे – बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी संघटना व रवींद्र माने सातारा जिल्हा सचिव हे उपस्थित होते.

समारोपाच्या सत्रामध्ये भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी कामगार कायद्यातील योग घातलेली बिल व त्या संदर्भात भारतीय मजदूर संघाची भूमिका जे लेबर कोड हे कामगारांचे हिताचे आहेत. त्याचे मजदूर संघ स्वागत करतो आहे व ज्या बिलांमध्ये कामगारांचे नुकसान आहे, त्यामध्ये दुरुस्त्या करणे आवश्यक आहे.
तसेच भविष्य निर्वाह निधी ची पेंन्शन किमान रू ५००० , प्रतिमाहे, कामगार आरोग्य विमा योजना( इएसआय) ची वेतन पात्रता प्रति माहे रू एकवीस हजार एवजी बेचाळीस हजार रूपये करण्यात यावी. असा ठराव संमत केला आहे.
या मागणीसाठी करिता सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकार ला निवेदन देण्याचा निर्धार भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनिल डुमणे यांनी मांडली.आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय मजदूर संघाच्या युवा मेळाव्यामध्ये युवकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाचे असल्याने भविष्यकाळातील हेच युवक भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी म्हणून नेते म्हणून काम करणार आहेत.त्यामुळे या सर्वांनी आजच्या काळामध्ये असलेली आपली भूमिका कणखर करून भारतीय मजदूर संघाचा विचार , शाखा ग्रामीण भागात पुढे न्यावी असे मनोगत भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश यांनी समारोप प्रसंगी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मुंबई जिल्ह्याचे सचिव संदीप कदम हे उपस्थित होते.

सदरच्या युवा संमेलन मेळाव्यास महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विविध उद्योगातील सहकारी बँका, राष्ट्रीय बँका, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, सुरक्षारक्षक, अंगणवाडी, आर सी फ , टोल नाका कामगार, दवाखाने, परिवहन, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, महाविद्यालये, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, विमा क्षेत्रातील कामगार, वीज कंत्राटी कामगार, पोस्ट कामगार, संरक्षण क्षेत्रातील कामगार, रेल्वे, अशा मोठ्या संख्येने कामगार युवा कामगार या मेळाव्यास उपस्थित होते. सदरच्या मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अर्जुन चव्हाण , सेक्रेटरी सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कार्यकारिणी ने प्रयत्न केले असल्याची माहिती यावेळी भारतीय मजदूर संघांचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिली. व पुणे जिल्ह्याच्या कार्यकारिणी चे यावेळी आभार मानले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
09:30