pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लाडक्या बहीण योजनेमध्ये झालेली फसवणुकीच्या बाबत तहसीलदार कार्यालय, उरण येथे शिवसेनेची धडक

0 3 1 4 7 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14

गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदेशाने व जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उरण तर्फे तहसीलदार उद्धव कदम यांना भाजपा, शिंदे, अजित पवार यांच्या महायुती सरकार विरोधात निवेदन देण्यात आले. २०२४ च्या निवडणूकीत लाडकी बहीण योजनेच्या १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने जुमलेबाज महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. खोटी आश्वासने देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा उपस्थितांनी दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी एन डाकी, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका संपर्कप्रमुख दिपक भोईर, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, तालुका उपसंघटक रूपेश पाटील, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, माजी उपसभापती हिराजी घरत, उपजिल्हा संघटीका ममता पाटील, उरण शहर संघटिका सुजाता गायकवाड, जिल्हानिहाय वक्ता मनीषा ठाकूर, महिला विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, वशेणी सरपंच अनामिका म्हात्रे, कविता पाटील, शाखा संघटिका लता राठोड सोशल मिडिया समन्वयक नितिन ठाकूर, विभागप्रमुख नारायण तांडेल, राजन कडू, वैभव करंगुटकर, माजी शाखाप्रमुख पागोटे रमेश पाटील, हितेद्र म्हात्रे, डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे