pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दरेगाव येथे भास्कर (आबा) दानवे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

0 3 1 4 6 8
जालना/प्रतिनिधी, दि.4
मौजे दरेगाव ता. जि. जालना येथे (दि.०४) माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख मा. भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना “दादांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्याला विकासाला नवसंजीवनी लाभली आहे. त्यांच्या माध्यमातून रेल्वे, रस्ते, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, नियमित पाणीपुरवठा या सर्व प्रश्न सुटून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे, जालन्यातील आयसीटी कॉलेज, मेडिकल कॉलेज, जालना – जळगाव रेल्वे मार्ग अशी अनेक कामे आजही होत आहेत आणि मा. रावसाहेबदादा दानवे यांच्या नेतृत्वात ही विकासकामे निरंतर होतच राहतील, गावासाठी यापुढेहाय कोणत्याही प्रकारचा निधीं कमी पडू दिला जाणार नाही. निवडणुकीच्या काळात काही खोट्या गोष्टी जनसमान्यात पसरविण्यात आल्या होत्या या पुढे अश्या गोष्टीना भुरळ न पडता गेली २५ वर्ष तुम्ही जी साथ दिली असेच यापुढेही राहूद्य” असे प्रतिपादन यावेळी मा. भास्करआबा दानवे यांनी यावेळी केले.दरेगाव येथे छ. शिवाजी महाराज पुतळ्यास सभागृह बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष्य रूपये, अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्यासाठी १० लक्ष्य रूपये, सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष्य रूपये, दलीतवस्तीमध्ये सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी १४ लक्ष्य रूपये निधी खासदार निधी अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आला होता, तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष्य रूपये, दलितवस्ती (जि.प.) योजनेंतर्गत सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी ३५ लक्ष्य रूपये, ९५०५ योजनेंतर्गत सिमेंट रोड चे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रूपये, धनगर वस्ती योजनेंतर्गत सिमेंट रस्ता व नाली करण्यासाठी ५ लक्ष्य रूपये निधी मंजूर करण्यात आला होता, यावेळी या सर्व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावकऱ्यांच्या मागणीनुसार दरेगाव ते पिंपळगाव रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी ८५१५ योजनेंतर्गत १८ लक्ष्य रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी या कामाचे देखील भूमिपूजम भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठडे, भागवतबापू बावणे, कपिलजी दहेकर, संजय डोंगरे, ज्ञानेश्वर देवडे, निवृत्ती लंके, मुकेश चव्हाण, गोवर्धन कोल्हे, कृष्णा गायके, उद्धव ढवळे, सोनाजी तिरुखे, आत्माराम ढवळे, जगुनाना ढवळे, दिलीप तिरुखे, बबन ढवळे, रघु ढवळे, भास्कर ढवळे, ज्ञानदेव आवटे, मुरलीधर आईंदे, मुरलीधर ढवळे, एकनाथ कोरडे, प्रभाकर ढवळे, दगडू जोशी, गणेश खाडेकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे