रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम कौतुकास्पद – माजी आमदार बाळाराम पाटील
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास सभासद बंधू भगिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
रयत सेवक बँकेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या गुणवंत पाल्य सत्कार सोहळा वाशी शाखेने मॉडर्न कॉलेज वाशी येथील भव्य हॉलमध्ये आयोजन केला होता.सदर कार्यक्रमास रायगड विभागाचे विभागीय चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.तर मॅनेजिंग कौन्सील सदस्य पाटील सर, ठाकूर मॅडम,जी.आर.पाटील सर,तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्ह्याचे मुख्य प्रवक्ते शंभूराज खलाटे ,रयत सेवक बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड हे उपस्थित होते.
भव्य अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन वाशी शाखा समिती चेअरमन राजेंद्र शिर्के संचालक सुरेश तिटकारे सभासद प्रतिनिधी रोशन गावंड,पुरण पाटील, शाखाप्रमुख विद्याराणी थोरात आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते.सदर कार्यक्रमास रायगड विभागातील अनेक मान्यवर यांचे सहित सर्व सत्कारमूर्ती तसेच वाशी कॉलेजच्या प्राचार्य नायक मॅडम,वाशी विभागाचे माजी सहाय्यक विभागीय अधिकारी फडतरे साहेब, माजी प्राचार्य मोहिते साहेब,स्वीकृत संचालिका रेश्मा खुटारकर मॅडम यांचे सहित अनेक मुख्याध्यापक व बँकेचे सभासद हजर होते.अध्यक्षीय भाषणातून बोलताना बाळाराम पाटील साहेब यांनी असे सांगितले की रयत बँकेचा हा गुणवंतांना पाठबळ देण्याचा कार्यक्रम हा स्तुत्य असून आम्ही बँकेच्या पाठीमागे सदैवपणे उभे आहोत.
प्रमुख पाहुणे शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते शंभूराज खलाटे साहेब यांनी सांगितले की बँकेने सभासदांच्या हिताबरोबर सामाजिक बांधिलकी जपली असून सदरील सत्कारामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम बँक करीत आहे.
रयत बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड यांनी बँकेच्या सद्य प असणाऱ्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.
जी.आर पाटील यांनी परखड शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना श्री गायकवाड सर आणि शिर्के सर हे एका स्टेजवर बसल्याचे पाहून आपणास खूप आनंद झाला आहे.ही दोस्ती अशीच टिकावी व त्याच वेळेस संघटनेला आणि बँकेला सुद्धा भविष्यात चांगले दिवस येतील असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक वाशी शाखा चेअरमन राजेंद्र शिर्के सर यांनी केले त्याप्रसंगी त्यांनी वाशी विभागातील सर्व सभासदांचे अभिनंदन केले व आभार मानले कारण वाशी कार्यक्षेत्राने आम्हास निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचंड साथ दिली असून माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
शेवटी आभार प्रदर्शन संचालक सुरेश तिटकारे यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी रमेश खुटारकर सर यांचे मित्र परिवार व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले व वाशी कार्यक्षेत्राचा अप्रतिम असा सत्कार सोहळा संपन्न झाला.