राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित..!

अंबड/प्रतिनिधी, दि.23
शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात आपण या समाजाचे देणे लागतो या प्रांजल भूमिकेतून निस्वार्थ कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. विद्यार्थी हेच दैवत मानून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धित शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्याचा सदैव प्रयत्न असतो. प्रामाणिक कार्याचे आणि कष्टाचे फळ नक्कीच मिळते..!अहमदनगर येथील ध्येय उद्योग समूहाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक 2024 पुरस्काराने समारंभ पूर्वक सन्मानित होणे हे माझ्या कष्टाचे चीज झाल्याचे व विद्यार्थ्यांच्या सेवेचे फलित म्हणता येईल..!
आणि त्यामुळेच मला प्रदान झालेला राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित..!