ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

जालना/प्रतिनिधी,दि.27
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय आणि जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप प्राचार्या डॉ. सुनंदाताई तिडके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
यावेळी कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, डॉ.रावसाहेब ढवळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सतीश जाधव, शंकर पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये रसिकांना परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन अशा विविध सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथोत्सवातील विविध कार्यक्रमांना साहित्यिक, कवी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.