ब्रेकिंग
आयुष्यमान भव मोहीम; जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी आरोग्य मेळाव्याचे ग्रामीण रुग्णालयात आयोजन

0
3
1
4
3
2
- जालना/प्रतिनिधी,दि. 22
केंद्र शासनाच्या महत्वांकाक्षी आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत जालना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयस्तरावर आयुष्यमान आरोग्य मेळावा भोकरदन, घनसावंगी, परतूर, बदनापूर आणि टेंभूर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवार दि.23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरुन तसेच वैद्यकिय महाविद्यालय स्तरावरील विशेषज्ञ यांच्याकडून रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यक असल्यास पुढील संस्थेत संदर्भित सेवा देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
1
4
3
2