औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद/प्रतिनिधी,दि. 7
औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीची अध्यक्ष निवडीची बैठक संचालक (माहिती) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत साम टि. व्ही. औरंगाबादचे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अध्यक्ष निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य श्री. चक्रधर दळवी, श्री. अनिल महाजन, श्री. विनोद काकडे,श्री. अरुण सुरडकर यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला.
डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया संचालक (माहिती) कार्यालय, औरंगाबादचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्यांसह जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,माहिती अधिकारी मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते.