pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शासकीय महिला राज्यगृहासाठी भाड्याने इमारत देण्यासाठी इमारत मालकांनी अर्ज सादर करावेत

0 1 7 7 5 8

जालना/प्रतिनिधी,दि.1

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शांतीकुंज शासकीय महिला राज्यगृह जालना ही संस्था जालना कार्यरत आहे. या संस्थेसाठी 5 हजार 500 चौरस फुटापर्यंची निवासी इमारत भाड्याने हवी आहे. तरी जालना शहरातील इच्छुक इमारत मालकांनी अर्ज जालना येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे.
शासकीय महिला राज्यगृह जालना ही संस्था अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम-1956 अंतर्गत पीडित महिला व कोर्टामार्फत दाखल झालेल्या तसेच संकटात सापडलेल्या महिलांसाठी कार्यरत आहे. या संस्थेची प्रवेशितांची मान्य संख्या 100 आहे. या संस्थेसाठी 5 हजार 500 चौरस फुट निवासी इमारत, इमारत बांधकाम क्षेत्रात 10 स्नानगृहे, 14 स्वच्छतागृहे, पिण्याच्या व वापराच्या पाण्याची व्यवस्था संरक्षण भिंतीसह सुस्थितीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व प्रवेशितांच्या दृष्टिने सुरक्षित आवारात उपलब्ध असलेली सुसज्ज इमारत शासकीय संस्थेस बांधकाम विभागाच्या चटई क्षेत्राच्या दरानूसार भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. अशी सर्व सोई-सुविधायुक्त इमारत उपलब्ध इमारत मालकांनी असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला जालना या कार्यालयात लेखी प्रस्ताव 3 प्रतित 7 दिवसाच्या आत सादर करावेत, उशीरा प्रस्ताव आल्यास ग्राह्य धरण्यात येणार नाही. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे