महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मधूबन कॉलनी परिसरातील नागरिकांची जीव धोक्यात

जालना/प्रतिनिधी,दि.29
मधुबन कॉलनी परिसरातील अशिष चव्हाण यांच्या घराजवळील विद्युत पोल रस्त्यावर खाली पडला.
तीन दिवस उलटूनही सदरील पोल कडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले त्यामुळे येथील महिला भगिनी विद्यार्थी नागरिकां चे रस्त्यावरील जाणे येणे बंद झालेले आहे.
या पोलवर विद्युत तारा लोमकाळलेल्या आहे .कोणत्याही क्षणी तारेच्या स्पर्श झाल्यास विद्युत प्रवाह द्वारे नागरिकाचा जीव धोक्यात होऊ शकतो.
वरील बाब नगरसेविकास व संध्या संजय देठे यांनी महावितरणचे अधिकारी साहेब आणि घाणगे साहेब यांच्याशी दूरध्वनी होऊन सांगून सुद्धा चौथा दिवशी सदरील काम झाले नाही.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा जो धोक्यात पडलेला आहे म्हणून महावितरणने तात्काळ याची दखल घ्यावी असे संध्या संजय देठे यांनी महावितरण कडे मागणी केली आहे