pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ऐतिहासिक, पुरातन वास्तू जतन करणे आपले कर्तव्य बनते – विजयमाला अनिल भालेकर

0 3 1 4 2 4

 अंबड / प्रतिनिधी,दि.5

अंबड शहरातील शिल्पकलेचा उत्तम नमुना असणान्या प्राचीन व ऐतिहासिक खंडोबा मंदिरास २ एप्रिल रोजी लक्ष्मण बेवले, सुखदेव मंडलिक, संदीप लोहकरे, तुळशीराम मापारी, पप्पू लांडे, भाऊसाहेब खरात, भगवान माईड, अनिल भालेकर, शरद तायडे यांनी भेट दिली.

या मंदिराच्या चिरेबंदी भिंतीवर जाहिरात निदर्शनास आल्यापासून समाजबांधव जातीने या मंदिराकडे लक्ष देत आहेत. या मंदिराच्या संरक्षण व जतनासाठी ज्या महत्वपूर्ण समस्यावर काम करणे गरजेचे होते त्याची पाहणी यावेळेस करण्यात आली. संबंधितांना अत्यंत कटाक्षाने सांगितल्याप्रमाणे चिरेबंदी भिंतीवरील वाढलेले झाडे, झुडपे गवत काढून त्या ठिकाणी वरंडी करणे आवश्यक होते, ज्यामुळे पावसाचे पाणी त्या भिंतीमध्ये मुरून भिंत कमकुवत होणार नाही. सदरील भिंतीला वरंडी केली आहे. परंतु कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दिसून आला. झालेल्या कामाच्या ठिकाणी पाणी मारणे आवश्यक असतानाही पाणी मारलेले दिसून आले नाही, तसेच भिंतीवरील गवत तसेच ठेऊन थातूरमातूर मिक्सिंग मध्ये काम करण्यात आलेले दिसून आले. याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून संबंधितांना हे काम परत करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. या संबंधी पप्पू भाऊ लांडे यांनी मिस्तरी काम करणाऱ्यास जागेवर बोलून घेऊन संबंधित काम करण्यासाठी सांगितलेले आहे. विशेष म्हणजे कामाचा दर्जा हा उत्तम साथ, अमूल्य असणार आहे. मंदिरातील मूर्तीच्या पूजेवेळी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची योग्य पद्धतीने नियोजन नसल्यामुळे हे पाणी एकत्र साठवून अत्यंत दुर्गंधी निर्माण झाली होती. यासंबंधी काम हाती घेण्यात आले असून याबाबत काम समाधानकारक आहे. मंदिराची देखभाल करणाऱ्या प्रमुख पुज्यारांशी सर्व कामा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून कामाच्या दर्ज्या बाबत हलगर्जी सहन केला जाणार नसल्याची सक्त ताकिद दिली आहे. तसेच त्यांना भेडसावणारा अडचणी बाबत सर्व खंडोबा भक्त खंबीर पने सोबत असल्याचे आवर्जून सांगितले आहे…!

आपल्या सर्वांची मार्गदर्शन, सूचना, सहकार्य सोबत असावे ही विनंती विजयमाला अनिल भालेकर यांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
19:49