बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आनंदोत्सव

शहगड/ तनवीर बागवान,दि.18
वडीगोद्री बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्यासह शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फटाके फोडून कोर्टाच्या निर्णयावर आनंद साजरा केला आहे.राज्य सरकारने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी कायद्यात केलेले बदल समाधानकारक असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने आज हा निर्णय दिला होता.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,राज्य कार्यकारीणी सदस्य शिवाजी भोसले,स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे,परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण अंभुरे,अंकूश तारख,तात्याराव गोरे,भारत उंडे,काकासाहेब बिडवे,कैलास बिडवे,बालासाहेब बिडवे,बाळासाहेब बिडवे,सुधीर बिडवे,संदीप बिडवे,रंजीत बिडवे,बालेराव गोरे,सिताराम राजबिंडे,रोहिदास बागल,आसाराम चव्हाळ,शिवाजी राजबिंडे,राजे राजबिंडे आदींनी एक दुसऱ्यास पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
“अकरा वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली.हा निर्णय स्वागतार्ह आहे.या निर्णयामुळे गावगाड्यातील शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असलेली बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात मोठ्या जल्लोषाने आयोजीत केली जाईल यात तीळ मात्र शंका नाही”…सुरेश काळे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,जालना