pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

0 3 1 4 1 0

मुंबई, दि.10

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवावैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागगट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

प्राध्यापकमनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ., सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापकनेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापकप्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (परभणी), सहायक प्राध्यापकआय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापकविकृतीशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-असिंधुदुर्गचा निकाल जाहीर

प्राध्यापकविकृतीशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-असिंधुदुर्ग  या पदाच्या मुलाखती २८ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

सहयोगी प्राध्यापकशरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयधाराशिवगट-अ चार निकाल जाहीर

सहयोगी प्राध्यापकशारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयधाराशिवगट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापकक्षयरोगशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ चे निकाल जाहीर

प्राध्यापकक्षयरोगशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या

प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीर

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल १० ऑक्टोबर२०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेच्या अंतिम निकालानुसार प्रतिक्षायादीतून उमेदवार उपलब्ध करुन देण्याची शासनाने मागणी केली आहे. त्यानुसार अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतिक्षायादीतून गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत.

प्रतिक्षायादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे