वाई येथे संगीत रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताह बजरंग बली प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा

विरेगाव / गणेश शिंदे, दि.6
मंठा तालुक्यातील वाई येथे सद्गुरु भगवान महाराज आनंदगडकर यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह, संगीत रामायण कथा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आणि चक्री भजन सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ४ ते ६ भजन, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ९ ते ११ गाथा भजन, दुपारी १ ते ४ राम कथा, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन होईल.
राम कथा प्रवक्ते ह.भ.प. जय महाराज सरनाईक (वाशिम). यात मंगळवारी डॉ. अरुण महाराज वाळके पैठण, बुधवारी उद्धव महाराज राऊत आकणीकर, गुरुवारी विश्वंभर महाराज माळोदे आष्टी, शुक्रवारी नारायण महाराज पिपळे गुरजी, शनिवारी नंदू महाराज जाधव खडका, रविवारी सागर महाराज दिंडे नाशिक. सोमवारी सकाळी ९ वाजता श्री रामदूत बजरंगबली प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मठाधिपती गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत भगवत गिरीजी महाराज व श्री महंत बालक गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते होईल. नंतर १० ते १२ काल्याचे किर्तन ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशीकर यांचे होईल आणि सांगता होईल. नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.