अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी अॅपद्वारे ई-केवायसी करावी -जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर
जालना/प्रतिनिधी,दि. 25
महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकाधारकांना “ई-केवायसी” करणे बंधनकारक केले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीसाठी सरकारने एनआयसीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी “मेरा ई-केवायसी” हे अॅप सुरू केले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, जेणेकरून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही. तसेच लाभार्थ्यांनीही अॅपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.
स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केली जात आहे. परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने “मेरा ई-केवायसी” अॅप तयार केले असून त्यावरून लाभार्थी दुकानात न जाता स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे केवायसी घरबसल्या पूर्ण करू शकतील. मात्र त्यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे. ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी असून, महाराष्ट्राबाहेरील स्थलांतरीत लाभार्थ्यांसाठी आयएमपीडीएस केवायसी पर्याय उपलब्ध आहे.
लाभार्थ्यांनी घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी Play Store वरून Mera eKYC आणि AadhaarFaceRD हे दोन्ही अॅप डाऊनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टाल करावीत. दोन्ही इन्स्टाल अॅपना आवश्यक परवानग्या देऊन, Mera eKYC अॅप उघडून राज्य महाराष्ट्र निवडावे. आधार क्रमांक टाकून आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP टाकून, कॅप्चामध्ये दिलेल्या कोडची नोंद करावी. चेह-याद्वारे पडताळणी करण्याकरिता सेल्फी कॅमेरा चालू करून चेहरा स्कॅन करावा. स्क्रीनवर दिलेल्या सुचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. दुस-या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरावा. याप्रमाणे कार्यवाही करून लाभार्थ्यांना घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करता येते. जालना जिल्ह्यात एकूण 15 लाख 89 हजार 537 लाभार्थी असून, त्यापैकी 5 लाख 16 हजार 739 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे अद्याप बाकी आहे.