जिजामाता क्रीडा मंडळ किनगाव आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे थाटात उद्घाटन !

जालना/प्रतिनिधी, दि.15
अंबड: जिजामाता क्रीडा मंडळ किनगाव चौफुली या ठिकाणी दि.15 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या दरम्यान कबड्डीच्या तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे वैशिष्ट्ये अशी : सदरील शिबिर हे निवासी असून फक्त मुलांसाठी असणार आहे,कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण, आहार विषयक मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी बौद्धिक सत्राचे आयोजन,किडा मानसशास्त्र ज्ञानाचे आयोजन तसेच या शिबिराला राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या क्रीडा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल व टीव्ही पासून दूर राहण्याची सवय लागणार आहे शिबिराचे उद्घाटन जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनगाव या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा तालुकाप्रमुख युवा सेना बालासाहेब इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कैलास मुके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद जाधव , प्रतिष्ठित व्यापारी महेश रायकर , शिवसेना शहरप्रमुख दत्ता शिराळे, उद्योजक अविनाश शिंदे आणि रोहिलागडचे सरपंच अड शामसुंदर पाटील हे होते.