तृप्ती श्रीपद मांडे (वय ४५) यांचे सोमवारी दि.११ मार्च रोजी सकाळी ८ वा. आकस्मिक निधन झाले आहे. डोंगरगाव केंद्र काजळा येथील शाळेचे मुख्याध्यापक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा पदाधिकारी श्रीपाद मांडे यांच्या त्या पत्नी होत्या. त्याच्या पश्चात एक मुलगा आहे. त्यांच्या पार्थिवावर रामतीर्थ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.