प्रा. डॉ. सुरेश सोनवणे यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.29
गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू असून डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी आपल्या अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला मागील सलग पंधरा वर्षे, सतरा वर्ष आमदार म्हणून जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी जनतेचा विश्वासघात केलाच परंतु सामान्य जनतेच्या डोळ्यातील विकासाऐवजी मिरचीचा भुकटा फेकून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे काम केले आहे या राजकारण्यांना यावेळी सुज्ञ जनता घरी बसवेल याची मला खात्री आहे आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी तालुक्यातील ठराविक बागायत ठराविक प्रश्नासाठी काम करण्यात आले एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती करणे कंपनी कारखानदार उद्योजक यांना संरक्षण मिळवून देणे एमआयडीसीतील मूलभूत प्रश्न व ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे विद्यार्थ्यांना परीक्षा भुमिक व स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देणे सरकारी नोकरदार शिक्षक शेतकऱ्याचे प्रश्न यासह पाणी आरोग्य रस्ते या मूलभूत प्रश्नांना नजरेसमोर ठेवून हे प्रश्न पाच वर्षांमध्ये मार्गी लावण्यासाठी पुढील पाच वर्ष मायबाप जनतेने माझ्यावरआशीर्वाद रुपी विश्वास ठेवावा निवडणुका हा पैशाच्या बळावर किंवा जातीपातीचे राजकारण न करता ग्रामीण भागातील युवक शेतकरी उद्योजक वर्गांना केंद्रस्थानी ठेवून पूर्ण ताकदिशी लढवणार असल्याचे देखील यावेळी अपक्ष उमेदवार डॉक्टर सोनवणे यांनी सांगितले.