भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या त्रुटी पुर्ततेसाठी आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.13
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येते. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमानूसार देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा केली जाते. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांना लाभ देण्यात आलेला नाही. तरी सन 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या वर्षात अर्ज सादर केलेल्या अर्जातील त्रुटी दुरुस्तीची कार्यवाही सुरु असून संबंधित विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन त्रुटीची पुर्तता दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनंत कदम यांनी केले आहे.