उरणच्या माजी तहसिलदार मनिषा घरत यांचे निधन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
उरणच्या माजी तहसिलदार मनिषा मनोहर घरत (७५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.उरण तालुक्याच्या तहसिलदार पदावर व मुंबई उपनगरातील कुर्ला,मुलुंड व ठाणे येथे त्यांनी काम केले असून,त्यांच्या महसूल विभागातील कार्यकाळात विविध क्षेत्रातील व्यक्तींशी माणुसकीचे नाते निर्माण झाले होते.अतिशय प्रेमळ आणि प्रत्येकाला कामात मदत करणाऱ्या मनिषा घरत गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या मागे सेवा निवृत्त पती, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर उरणच्या बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री होत्या.