आपले सरकार सेवा केंद्राद्वारे एका क्लिक वर विविध सेवा उपलब्ध.
सर्वच स्तरातून नागरिकांचा मिळतोय उत्तम प्रतिसाद
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
ग्राम विकास विभागाने
सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभर गावपातळीवर ‘पॅनकार्ड’ पासून तर ‘पासपोर्ट’ काढण्यापर्यंत आणि किसान सन्मान योजनेपासून तर कामगारांच्या नोंदणीपर्यंतच्या सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील या प्रकल्पाला मिळालेल्या यशामुळे इतर राज्यातही अशाप्रकारचा प्रकल्प राबवला जात आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्प हा एक डीजिटल प्रकल्प असून याद्वारे सर्व पंचायतराज संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले असून या माध्यमातून जिल्हा मुख्यालयी सरकारी कार्यालयात उपलब्ध असलेल्या विविध सेवा नागरिकांना गावातच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.केंद्राच्या ‘सिटिझन कनेक्ट ऍप’ वर २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील २७,८६३ ग्रामपंचायतींमध्ये १२ लाख ३१ हजार ६१० नागरिकांनी नोंदणी केली व त्याद्वारे कर भरणा, वीज देयके भरणे व तत्सम स्वरूपाचे २४,०६४ व्यवहार केले. तर २ कोटी १६ लाख ७९,९६५ नागरिकांनी केंद्राच्या इतर सुविधांचा लाभ घेतला. केंद्र सरकारच्या कामगारांच्या योजनांसाठी चालू वर्षात ६२,८४० कामगारांनी या केंद्राद्वारे नोंदणी केली आहे.
—————————————————————
‘आपले सरकार’ सेवा केंद्र मिळणाऱ्या सेवा…
‘आपले सरकार’ सेवा केंद्राद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी नोंदणी, ई-केवायसी, पंतप्रधान पीक विमा, आयुष्मान भारत, पी एम विश्वकर्मा तसेच राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, अनुदान/ नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी करणे यासाठी हे केंद्र सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे ठरते. तसेच ग्राम पंचायतस्तरावर पॅन कार्ड ते पासपोर्ट, बैंक खाते काढण्यापासून ते त्यांना बँकेच्या सर्व सुविधा पुरवणे, टीव्ही, मोबाईल रिचार्जपासून ते विमा हप्ता भरणे, गैस बुकिंगपासून विमान तिकीट युकिंगपर्यंतची कामेही या केंद्रातून होतात, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाइल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तसेच ७/१२, ८अ उतारा व तत्सम सेवा दिल्या जातात
आता पर्यंत रायगड जिल्ह्यात
अलिबाग ११६०,
कर्जत २३६१,
खालापूर १४१०,
महाड १२६७,
माणगाव ११००,
म्हसळा १७२८,
मुरुड ५४७,
पनवेल २०५०,
पेण ८७२,
पोलादपूर ७१९,
रोहा १३६३,
श्रीवर्धन ६९३,
सुधागड ५८७,
तळा ७१२,
उरण ७७१,
एकूण १७३४० सिटीझन अँप नागरिक वापर करीत आहेत.
——————––———————————–
नागरिक सदर ऍप मधून आपल्या मालकी हक्काच्या मिळकतीचा भरणा (घरपट्टी,पाणीपट्टी ) सिटीझन ऍप मधून भरीत आहेत.सर्व सेवा डिजिटल झाल्यामुळे नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये वेळ आणि पैसा खर्च करून आता यायची गरज नाही नागरिक सर्व सेवांचा लाभ हा ऑनलाईन घेऊ शकतात. आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय अंतर्गत राबवला जातो.या माध्यमातून गावपातळीवर नागरिकांना एका क्लिकवर विविध सेवा उपलब्ध होतात .कुआर कोडद्वारे करसंकलन, डिजिटल ग्रा.पं, महाईग्राम ‘ऍप ‘ तसेच विविध कामांचे ऑनलाइन शोधण ‘ऍप ‘द्वारे केले जात असल्याने कामात पारदर्शकता आली आहे. नागरिक सदर सेवांचा लाभ घेत असून आपले सरकार सेवाकेंद्र या प्रकल्पाचा सर्व स्तरावरून स्वागत करीत आहेत
– जयेश म्हात्रे, प्रकल्प व्यवस्थापक कोकण
प्रशांत पाटील
उपजिल्हा व्यवस्थापक रायगड