शहागड : येथील एसटी बस स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने स्थानिकांसह प्रवाशांची कुचंबना होत होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतीश घाटगे यांनी शासनाकडे प्रयत्न करून आवश्यक निधी उपलब्ध दिला. त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली. या स्वच्छतागृहाचे काम सोमवारी सतीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झाले.शहागड बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीच्या कामास सुरुवात झाल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले. यावेळी शहागड येथील सर्व प्रतिष्ठित व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, अल्पसंख्याक विभागाचे नजीर शहा आसेफ कुरेशी, इम्रान खान, जमिरोद्दिन भाई, अशोकराव बोधे, इक्बाल बागवान, निसार कुरेशी , सुभाष उमरे , अब्दुल कुरेशी , नावेद कुरेशी, सर्फराज कुरेशी, मागुत कुरेशी, अन्वर शहा, जावेद बागवान, सलीम बागवान, फेरोज कुरेशी,फारूक कुरेशी, प्रकाश खाराद आदी उपस्थित होते.