pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घनसावंगीत उसळला जनसागर

0 3 1 4 0 1
घनसावंगी/प्रतिनिधी, दि.29
विधानसभा निवडणुकीत सतीश घाटगे यांनी विशाल असे शक्ती प्रदर्शन करत जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज  दाखल केला.  त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घनसावंगी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गावागावातून आणि खेड्या-पाड्यातून सर्वसामान्य जनता शेतकरी, कष्टकरी आणि युवक हजारोच्या संख्येने एकवटले होते. हजारो जनतेसमोर नतमस्तक होत , मी बंडखोरी केली नसून जनतेसाठी उठाव केला आहे. अशी भूमिका मांडत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.
माझी निवडणूक जनतेसाठी आहे. आणि जनता या लढाईत  विजयी होणार..असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.घनसावंगी विधानसभेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागेसाठी मोठी रस्सीखेच झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर घनसावंगी विधानसभेच्या जागेचा पेच सुटला. शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटली. मंगळवारी हिकमत उढान यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला. तर सतीश घाटगे यांनी जनतेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याची घोषणा करत हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज केला. दरम्यान महायुतीचे तिकीट शिंदे गटाला मिळाल्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी रात्रीच सोशल मीडियावर त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

जालना अंबड आणि घनसावंगीला दिला शब्द
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबड जालना आणि घनसावंगीतील दुष्काळी गावांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सतीश घाडगे यांनी लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट जनतेसमोर मांडला या तिन्ही तालुक्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट निवडून आल्यावर पूर्ण करणार असा शब्द नामांकन सभेत सतीश घाटगे यांनी जनतेला दिला.

सतीश घाटगे  यांनी पुन्हा मोडला गर्दीचा रेकॉर्ड
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. प्रमुख पक्ष्यांच्या उमेदवाराला देखील एवढा प्रतिसाद मिळाला नाही, तेवढा प्रतिसाद सतीश घाटगे यांना सर्वसामान्य जनतेचा मिळाला. नामांकन सभा व रॅलीसाठी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून जवळपास 25 ते 30 हजार जनसंख्या उपस्थित होती. भारतीय जनता पार्टीचे बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी सोडता सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सतीश घाटगे यांच्यासोबत खंबीर उभे असल्याचे या सभेत दिसले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे