पळसा येथे विविध विकास कामाचा शुभारंभ

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.13
पळसा येथे ग्रामपंचायतीने आपल्या आयोगासह स्मशानभूमीत लोकसहभागातून केलेला कायापालट करीत उपसरपंच उद्योगजक संजय काला यांनी आपला वशीला खर्च करीत पळसा येथे विविध विकास निधीतुन काम मंजुर करीत विविध विकास कामाचा धडाका सुरु केला. गावातील विविध विकास कामामुळे गावक-याकडुन समाधान व्यक्त होत असून राज्यसभा खासदार प्रफुलभाई पटेल विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र
मंजुर केलेल्या पळसा ग्रामपंचायती समोरील रस्त्यासह बिरोबा महाराज मंदिराकडे जाणारा रस्तासह विविध विकास कामाचा शुभारंभ सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत धुमधड्यात करण्यात आला.
यावेळी पळसा सरपंच आशाताई धाडेराव, उपसरपंच संजय भाऊ काला ,माजी सरपंच शिल्पाताई रणजित कांबळे, माजी सभापती कोंडबाराव दवणे , संजय गांधी निराधार योजना सदस्य गजानन मस्के, शंकरराव कदम, शंकरराव मस्के वागदरकर , नरेंद्र नवघरे, माजी उपसरपंच डॉ पिराजी पवार, रणजित कांबळे,शंकर वालगोटवाड, ग्रामपंचायत सदस्य कामाजीराव निमडगे ,ज्ञानेश्वर हाराळे, रामराव मस्के, यांच्यासह शिवदास कदम, दत्ता नरवाडे, प्रकाश धनगरे, प्रकाश गंगासागर,महेश चिंचोलकर, बालाजी धाडेराव गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी उपस्थित उपस्थित होते.