शोकसभेत विविध मान्यवरांनी वाहिली कै.गंगादेवी बालदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दि. १४ मार्च २०२५ रोजी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.आमदार महेश बालदी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने बालदी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यु. ई. एस स्कुल (पालक मैदान )बोरी उरण रोड येथे ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.या शोक सभेस मंत्री मेघना बोर्डीकर,लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,खासदार श्रीरंग अप्पा बारणे,वनमंत्री गणेश नाईक, भाजप नेते किरीट सोमय्या,माजी महापौर सागर नाईक,पनवेल विधानसभा मतदार संघांचे आमदार प्रशांत ठाकूर,पोलीस अधिकारी, इतर विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी कै.गंगादेवी बालदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि परिवाराचे सांत्वन केले.रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यु. ई. एस स्कुल (पालक मैदान )बोरी उरण रोड येथे ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.या शोकसभेस प्रतिष्टीत मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकही मोठया प्रमाणात उपस्थित होते.