pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री गजानन महाराज दिंडीनिमित्त अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

0 3 1 3 8 9

जालना/प्रतिनिधी,दि.26

श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी पंरपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर आहे. या दिंडीमध्ये 700-800 वारकरी सहभागी आहेत. सदर पायी दिंडी ही दि. 30 जुलै 2024 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असून दि. 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 पर्यंत गोंदी व अंबड हद्दीत मुक्कामी राहुन दि. 1 ऑगस्ट रोजी गोलापांगरी मार्गे जालना शहराकडे प्रयाण करणार आहे.  दिंडीचे दर्शन घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन अवजड वाहनांच्या रहदारीमुळे विवादीत परिस्थिती निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहे.

मंगळवार दि. 30 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासुन ते रात्री 11 वाजेपावेतो हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उडडानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी अवजड वाहने थांबवुन, सदर वाहने पाचोड- अंबड मार्गे जालनाकडे जातील व जालनाकडुन शहागडकडे जाणारी वाहने अंबड-पाचोडमार्गे शहागडकडे जातील.

बुधवार दि. 31 जुलै 2024 रोजी सकाळी 3  वाजेपासुन ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरी उडडानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहने थांबवुन, पाचोड- जामखेड फाटा- जामखेड- किनगाव चौफुली- बदनापुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडून येणारी वाहने बदनापुर- किनगाव चौफली- पाचोड मार्गे शहागडकडे जातील. तसेच शहापुर ते शहागड व अंबड ते पाचोड मार्गावरील गावातील अवजड वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच पारनेर फाटा ते छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या गावातील अवजड वाहनांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

गुरुवार दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 3 वाजेपासुन ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उडडानपुलाचे खालुन व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करुन, सदर वाहने वडीगोद्री- पाचोड- जामखेड फाटा- जामखेड- किनगाव चौफुली बदनापुर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडुन येणारी वाहने बदनापुर- किनगाव चौफुली जामखेड जामखेड फाटा- पाचोड मार्गे शहागडकडे जातील.  तसेच अंबडकडून जालनाकडे जाणारी अवजड वाहने सकाळी 3  ते रात्री 11 वाजेदरम्यान बंद करुन सदर वाहने किनगाव चौफुली- बदनापुर मार्गे जालनाकडे जातील व जालनाकडून अंबडकडे येणारी अवजड वाहने बदनापुर- किनगाव चौफुली- जामखेड- पाचोड मार्गे शहागडकडे जातील. याप्रमाणे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे